News Flash

“भाईजानमुळे माझं करिअर वाचलं”; अभिनेत्याने मानले सलमान खानचे आभार

... तेव्हा सलमान खान माझ्या मदतीला धावून आला होता

बिग बॉसमध्ये सलमान खाने याने आपल्या पहिल्या कमाईबद्दलची माहिती दिली होती. सलमान खानला पहिला पगार म्हणून अवघे पंच्याहत्तर रुपये मिळाले होते. ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये सलमानने नृत्य केलं होतं.

अभिनेता सलमान खानला बॉलिवूडचा गॉडफादर असं म्हणतात. कारण सलमान बॉलिवूड कलाकारांच्या मदतीला धावून जातो. आजवर त्याने कतरिना कैफ, झरिन खान, आयुष शर्मा, डेझी शहा, सुरज पांचोली अशा कित्येक कलाकारांना त्यांचे सिनेकरिअर सावरण्यासाठी मदत केली आहे. या यादीत कधीकाळी अभिनेता आसीफ शेख याचे देखील नाव होते. सलमानमुळेच त्याचे करिअर वाचले असे तो म्हणाला.

सर्वाधिक वाचकपसंती – अभिषेकने शेअर केला ३९ वर्ष जुना व्हिडीओ; बिग बींनी अशी करुन दिली होती ओळख

ETimesला दिलेल्या मुलाखतीत आसीफ म्हणाला, “सलमानभाई नसता तर माझे करिअर वाचू शकले नसते. १९८८ साली ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाच्या निमित्ताने माझी सलमानसोबत मैत्री झाली होती. ही मैत्री आजतागायत कायम आहे. माझ्या करिअरमध्ये अशीही एक वेळ आली होती जेव्हा मला काम मिळत नव्हते. मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका करुन मी माझे करिअर पुढे ढकलत होतो. त्यावेळी सलमान माझ्या मदतीला धावून आला. त्याने मला ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘कवारा’, ‘करण अर्जुन’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यावेळी सलमान नसता तर माझे करिअर वाचू शकले नसते.”

सर्वाधिक वाचकपसंती – “कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप

आसीफ शेख बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने प्रामुख्याने खलनायक व्यक्तिरेखा मोठ्या प्रमाणावर साकारल्या आहेत. त्याने सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आसीफने टीव्ही मालिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ‘हम लोग’, ‘यस बॉस’ आणि ‘भाभीजी घर पर है’ त्याच्या या मालिका सुपरहिट झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:42 pm

Web Title: salman khan got me good films during my rough phase aasif sheikh mppg 94
Next Stories
1 रणबीर-दीपिका ‘या’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा येणार एकत्र?
2 Video : सागर कारंडेशी धमाल गप्पा आणि भारत गणेशपुरेची सरप्राइज एण्ट्री
3 Video : जया बच्चन यांच्या ‘त्या’ शब्दांमुळे ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी
Just Now!
X