News Flash

भांडण मिटलं?, लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाईजान प्रियांकाच्या रिसेप्शन पार्टीत!

प्रियांका निकच्या रिसेप्शन पार्टीत जे पाहुणे सर्वात आधी पोहोचले त्यात सलमानही होता.

भांडण मिटलं?, लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाईजान प्रियांकाच्या रिसेप्शन पार्टीत!

प्रियांका चोप्रा आणि सलमान खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून रुसवे फुगवे सुरू होते. प्रियांकानं ऐनवेळी त्याच्या बिग बजेट चित्रपटातून माघार घेतल्यानं सलमानचा पारा खूपच चढला होता. प्रियांकाचं अव्यवाहारिक वागणं त्याला अजिबात पटलं नव्हतं, त्यानं अघडपणे प्रियांकाच्या वागण्यावर बोचरी टीका करत आपली नाराजी बोलून दाखवली होती. इतकंच नाही तर प्रियांकासोबत पुन्हा काम न करण्याचा कठोर निर्णयही त्यानं घेतला होता.

पाहा फोटो : ‘देसी गर्ल’च्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी

मात्र या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत सलमान प्रियांकाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी रिसेप्शन पार्टीत पोहोचला. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये प्रियांकानं बॉलिवूडसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत रणवीर दीपिकापासून ते बॅडमिंटनपटू सायना नेहवालचीही उपस्थिती पाहायला मिळाली. पण, या सगळ्यात लक्ष वेधलं ते बॉलिवूडच्या भाईजान सलमानच्या उपस्थितीनं. सलमान आणि प्रियांका यांच्यात ‘भारत’ चित्रपटावरून दुरावा निर्माण झाला होता. प्रियांकावर सलमान नाराज होता. मात्र रिसेप्शन पार्टीत जे पाहुणे सर्वात आधी पोहोचले त्यात सलमान होता.

सलमाननं या दोघांनाही सुखी जीवनासाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या. प्रियांकानं ‘भारत’ सोडल्यानंतर सलमान नाराज होता.  काम मिळवण्यासाठी माझ्या बहिणीला तिनं हजारवेळा फोन केले होते. मात्र काम मिळताच तिनं ऐनवेळी नकार दिला. कदाचित आता तिला बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये काम करण्यात जास्त रस असेल अशी बोचरी टीका त्यानं केली होती. मात्र पार्टीसाठी हा सारा वाद विसरून तो आला होता. सध्या सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. चित्रिकरणातून वेळ काढत तो आणि कतरिना या पार्टीसाठी आला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 1:12 pm

Web Title: salman khan is first guest at priyanka chopra and nick jonas reception
Next Stories
1 VIDEO : रिसेप्शन पार्टीत दीपिका-प्रियांकाचा ‘पिंगा’
2 ज्येष्ठ संगीतकार लक्ष्मीकांत यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार
3 राधिका सुभेदारसमोर विक्रांत सरंजामेची फिल्मी स्टाइल पडली फिकी
Just Now!
X