20 September 2018

News Flash

२० वर्षांनंतर सलमान रंभा आले एकत्र, फोटो व्हायरल

भानं अभिनयाकडे काही वर्षांपूर्वीच पाठ फिरवली. सध्या रंभा कॅनडात स्थायिक झाली आहे. तिला एक मुलगीदेखील आहे.

१९९८ मध्ये आलेल्या 'बंधन' चित्रपटात ही जोडी दिसली होती.

सलमान आणि रंभा ही जोडी ‘जुडवा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. रुपेरी पडद्यावरची ही सुपरहिट जोडी ‘बंधन’ चित्रपटातही पाहायला मिळली. मात्र त्यानंतर बॉलिवूडमधली ही अभिनेत्री प्रसिद्धीझोतापासून दूर निघून गेली. वर्षभरापूर्वी आलेल्या ‘जुडवा २’ मधलं ‘नौ से बारा’ गाणं जेव्हा पुन्हा प्रदर्शित करण्यात आलं तेव्हा अनेकांना ९० च्या दशकातली रंभा आठवली. अखेर बऱ्याच वर्षांनी रंभा आणि सलमान ही जोडी दंबग टुरच्या निमित्तानं पाहायला मिळाली.

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 24990 MRP ₹ 30780 -19%
    ₹3750 Cashback
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%

सलमान दबंग टुरसाठी कॅनडात होता. सलमानसोबत कतरिना, जॅकलिन, सोनाक्षी, डेझी शहादेखील या टुरमध्ये सहभागी झाल्या होत्या. कॅनडामधल्या टोरँटो इथे शेवटाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी रंभा सहकुटुंब उपस्थित होती. कार्यक्रम संपल्यानंतर रंभानं सलमानची भेटही घेतली. १९९८ मध्ये ‘बंधन’ चित्रपटात ही जोडी दिसली होती. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी ही जोडी पुन्हा पाहायला मिळाली. रंभानं अभिनयाकडे काही वर्षांपूर्वीच पाठ फिरवली. सध्या रंभा कॅनडात स्थायिक झाली आहे. तिला एक मुलगीदेखील आहे. या दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दंबग टुरच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानी संघाचा माझी कर्णधार शाहीद आफ्रिदीनंदेखील सलमानची भेट घेतली होती.

First Published on July 11, 2018 12:27 pm

Web Title: salman khan meets rambha during dabangg tour 2018