News Flash

सलमानने ‘ट्युबलाइट’च्या अपयशाचं खापर फोडलं प्रदर्शनाच्या तारखेवर

चित्रपटांतून कोटींची कमाई करणाऱ्या सलमानला 'ट्युबलाइट'मुळे चक्क तोटा सहन करावा लागला होता.

सलमान खान

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’चा प्रदर्शनापूर्वी बराच झगमगाट होता. मात्र, प्रदर्शनानंतर या ‘ट्युबलाइट’चा उजेड पडलाच नाही. त्यामुळे चित्रपटांतून कोटींची कमाई करणाऱ्या सलमानला यावेळी चक्क तोटा सहन करावा लागला होता. हा तोटा थोडाथोडका नसून तब्बल ५५ कोटी रुपयांचा होता. या अपयशाचं खापर सलमानने आता प्रदर्शनाच्या तारखेवर फोडलंय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने ‘ट्युबलाइट’च्या अपयशावर स्पष्टीकरण दिलं. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता आणि हे अपयशाच्या काही कारणांपैकी एक कारण होतं असं त्याचं म्हणणं आहे. ‘ईद साजरी करताना लोक आनंदात, जल्लोषात होते. पण ‘ट्युबलाइट’ पाहिल्यावर ते चित्रपटगृहांतून भावूक होऊन बाहेर आले. मी निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकण्याबाबत विनंतीसुद्धा केली होती,’ असं तो म्हणाला.

Kesari Movie Review : कथा २१ वीरांच्या शौर्याची

ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचाही संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. वितरकांनाही मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे स्वतः बॉलिवूडच्या भाईजाननेच वितरकांची भरपाई करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 11:37 am

Web Title: salman khan opens up on the failure of his movie tubelight
Next Stories
1 पाहा कार्तिक-साराच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक
2 Kesari Movie Review : कथा २१ वीरांच्या शौर्याची
3 अभिनेत्री श्रद्धा कपूर अडकणार विवाहबंधनात?
Just Now!
X