बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होता. त्यानंतर चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. आता चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटातील नव्या गाण्याचे नाव 'दिल दे दिया है' असे आहे. तसेच या गाण्यात जॅकलिन दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकलिन ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. View this post on Instagram A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) आपले पहिले गाणे 'सिटी मार'च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे निर्माते आणखी एक डांस नंबर 'दिल दे दिया है' सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीज़र प्रदर्शित करण्यात आला असून गाण्याची एक झलक सादर केली आहे ज्यावरून आपल्याला अंदाज लावता येई कि हे गाणे किती धमाकेदार होणार आहे. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.