बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. सलमानच्या आयकॉनिक गाण्याचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, ‘सिटी मार’ हे गाणे पहिल्यापासूनच या वर्षीचे सर्वात मोठे चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर आहे.

सलमानचे हे गाणे कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंक चिका’ तयार केला होता.

आणखी वाचा : ‘राधे’साठी सलमानने तोडली ‘No kiss’ पॉलिसी, ट्रेलरमधील त्या सीनची चर्चा

सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत. जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे.

सोबतच, सलमान आणि दिशा या दोघांची केमिस्ट्री आणि उमद्या डान्स मूव्स सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत ज्या बघताना तुम्हीदेखील त्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. ‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.