News Flash

सलमानने लावली जीवाची बाजी!

सलमानला पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सलमान खान

अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्याला पोलिसांनी सध्या काम थांबवण्याचा सल्ला दिला होता. सलमानच्या सुरक्षेचा विचार करता पोलिसांनी थेट ‘रेस ३’च्या सेटवर जाऊन चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले होते. मात्र, सलमानने इतके होऊनही आपल्या कामाला अधिक प्राधान्य देण्याचा विचार केल्याचे दिसते. नुकतेच त्याने एका आगामी चित्रपटातील टायटल साँगचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

वाचा : ‘फू बाई फू’ फेम विकास समुद्रे ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल

सुत्रांच्या माहितीनुसार, सलमानने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत कडक सुरक्षायंत्रणेत गाण्याच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पुढचे पाच दिवस हे चित्रीकरण सुरु राहिल. सध्या तो सहकलाकार अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन, डेसी शाह, साकिब सलीम आणि फ्रेडी दारुवाला यांच्यासह मुंबइईतील एका स्टुडिओत चित्रीकरण करतोय.

‘पुणे मिरर’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात सलमानने त्याचे सहकलाकार आणि दिग्दर्शक रेमो डिसोझा यांच्यासह डान्सचा सराव केला. पण, बिग बॉस आणि इतर काही कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला सरावासाठी फार वेळ देता आला नाही. या गाण्यासाठी एक खास सेटही उभारण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात चित्रपटाची संपूर्ण टीम बँकॉकला जाणार असून, त्यानंतर दुबई तसेच अबू धाबी येथे ‘रेस ३’चे चित्रीकरण करण्यात येईल.

वाचा : शिवला लागलं बानूचं याड?

काही दिवसांपूर्वीच काळवीट शिकारप्रकरणी सलमानने जोधपूर न्यायालयात हजेरी लावली होती. त्याच दरम्यान त्याला पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने जीवे मारण्याची धमकी दिली. एका उद्योगपतीच्या हत्येच्या आरोपाखाली बिष्णोईला जोधपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, ‘सलमानला मी जोधपूरमध्येच संपवणार’, असे तो म्हणाला. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत लगेच वाढ करण्यात आली. तसेच, काही दिवसांसाठी रस्त्यावर सायकल न चालवण्याचा सल्लाही त्याला पोलिसांकडून देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 10:02 am

Web Title: salman khan risks his life for race 3 song
Next Stories
1 ‘फू बाई फू’ फेम विकास समुद्रे ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल
2 TOP 10 NEWS : मराठी ‘बिग बॉस’पासून ‘गुलाबजाम’ चित्रपटाच्या टीझरपर्यंत
3 राज कपूर सामाजिक जाणिवा समृद्ध असलेले दिग्दर्शक!
Just Now!
X