News Flash

‘…तर माझ्यावर खुशाल बहिष्कार टाका’, भडकला सलमान

'माझ्यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्रास होतोय ना?'

सलमान खान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १३’ चा नुकताच लॉन्चिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खान छायाचित्रकारांवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. छायाचित्रकार सतत सलमानचे फोटो काढत असल्यामुळे त्याच्या कामामध्ये व्यत्यय येत होता याच कारणासाठी सलमान भडकल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर माझ्यावर खुशाल बहिष्कार टाका, असं वक्तव्यही सलमानने रागाच्या भरात केलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा शो सुरु असतांना प्रत्येक फोटोग्राफर सलमानचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावत होते. सतत फोटोग्राफर्सचा विळखा आणि होणाऱ्या आवाजामुळे या लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये व्यत्यय येत होतो. अनेक वेळा शोच्या सूत्रसंचालकांनी सांगितल्यानंतरही छायाचित्रकार फोटो काढण्याचं काही थांबवत नव्हते. त्यामुळे हे संपूर्ण चित्र पाहिल्यानंतर सलमान छायाचित्रकारांवर भडकला. ‘माझ्यामुळे येथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्रास होतोय ना, मग एक काम करा माझ्यावर खुशाल बहिष्कार टाका ‘, असं रागामध्ये सलमान बोलून गेला. ‘टाइम्स ऑफ इंडिया टीव्ही’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमानचा राग स्पष्टपणे दिसून येत आहे.

सलमानने राग व्यक्त केल्यानंतरही काही छायाचित्रकार त्याचे फोटो काढत होते ते पाहून सलमान आणखीनच संतापला आणि, ‘ए भावा, अजून फोटो काढं. आम्ही आमची सगळी कामं बाजूला ठेवतो आणि फक्त फोटो काढून घेण्यासाठी एका जागी उभे राहतो’, असं म्हणाला.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सलमान प्रचंड खुश होता आणि त्याने ढोल-ताशाच्या तालावर ठेकाही धरला. छायाचित्रकारांवर संताप व्यक्त करणारा सलमान एकटाच बॉलिवूड कलाकार नसून यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी छायाचित्रकारांवर असा संताप व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 9:03 am

Web Title: salman khan says ban me if you want loses his temper at a photographer during a press meet ssj 93
Next Stories
1 Emmy Awards 2019 : अ‍ॅमेझॉनच्या फ्लीबॅग मालिकेला चार एमी पुरस्कार
2 BLOG : The Family Man : गोफ नव्हे गुंता!
3 ‘नेटफ्लिक्स’च्या ‘द व्हाइट टायगर’मध्ये प्रियांका-राजकुमार एकत्र
Just Now!
X