News Flash

सलमानने गायलं कतरिनासाठी गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचा भाईजान जेव्हा एक्स गर्लफ्रेंडसाठी गाणं गातो

सोशल मीडियावर सध्या थ्रोबॅक मेमरीजचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण आपले जुने फोटो किंवा व्हिडीओज सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आठवणींना नव्याने उजाळा देत आहेत. याच दरम्यान सलमान खानचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा भाईजान चक्क अभिनेत्री कतरिना कैफसाठी गाणं गाताना दिसत आहे.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

 

View this post on Instagram

 

Sallu singing for Katrina Who all think they make beautiful jodi?

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) on

अवश्य पाहा – हिंसाचाराच्या आरोपाखाली अभिनेत्याची हकालपट्टी; Ex-girlfriends मदतीसाठी आल्या धावून

सलमानला गाण्याची प्रचंड आवड आहे. अगदी लॉकडाउनमध्ये देखील त्याने ‘प्यार करोना’ आणि ‘तेरे बिना’ ही दोन गाणी तयार केली. सलमान चाहत्यांसाठी गातो असं म्हटलं जातं. परंतु या व्हिडीओमध्ये तो कतरिनासाठी गाताना दिसत आहे. त्याने ‘किक’ चित्रपटातील ‘ना मै अपना रहा ना किसी का रहा’ हे गाणं गायलं आहे. हा व्हिडीओ कुठल्याशा पुरस्कार सोहळ्यामधील आहे.

कधीकाळी सलमान आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये होते. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. या व्हिडीओच्या निमित्ताने त्यांचं जुनं प्रेम पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 7:36 pm

Web Title: salman khan sing a song for katrina kaif mppg 94
Next Stories
1 हिंसाचाराच्या आरोपाखाली अभिनेत्याची हकालपट्टी; Ex-girlfriends मदतीसाठी आल्या धावून
2 “मुंह साधू जैसे हो गया”; कार्तिकच्या दाढीवाल्या लूकची लहान मुलांनी उडवली खिल्ली
3 अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना दिले ५०० स्मार्टवॉच
Just Now!
X