News Flash

शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला विकत घ्यायचा होता सलमानला, पण..

एका मुलाखतीमध्ये सलमानने हा खुलासा केला आहे

मुंबईतील वांद्रे येथील बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला आहे. अनेक चाहते शाहरुखचा बंगला पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटींहून अधिक आहे. ऐकेकाळी हा बंगला विकत घेण्याची सलमान खानची देखील इच्छा होती. सलमानने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

सलमानने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला खरेदी करणार असल्याचे सांगितले. पण सलमानचे वडिल सलीम खान यांनी सलमानला बंगला खरेदी करण्याची परवानगी दिली नाही. ‘इतक्या मोठ्या घराचे काय करणार?’ असा प्रश्न सलीम यांनी सलमानला विचारला होता. त्यानंतर त्याने मन्नत खरेदी करण्याचा विचार बदलला.

 

View this post on Instagram

 

Beautiful homes are made by beautiful home makers. Bas!

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

शाहरुखच्या ‘मन्नत’ शेजारीच सलमनाचे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घर आहे. संपूर्ण कुटुंबीयांसोबत भाईजान तेथे राहतो. शाहरुखचा मन्नत हा बंगला ६०० चौरस फुटामध्ये आहे. बंगल्यामध्ये बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहेत. त्याच्या संपूर्ण बंगल्याचे इंटेरिअर डिझाइन स्वत: गौरी खानने केले आहे. शाहरुखने बंगला विकत घेण्यापूर्वी तो ‘विला विएना’ नावाने ओळखला जायचा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 2:51 pm

Web Title: salman khan wanted to buy mannat banglow avb 95
Next Stories
1 ‘तान्हाजी’ची विक्रमी कमाई; दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल
2 ‘देशी पोलिसांच्या आधी येणार विदेशी पोलीस’
3 बाळासाहेब भाषणातून गप्पा मारायचे पण राज..
Just Now!
X