News Flash

सूत्रसंचालन करण्यास ‘भाईजान’ पुन्हा सज्ज

मध्यंतरी सलमान छोट्या पडद्यापासून दूर गेला होता.

सलमान खान

दबंगगिरी करणा-या सलमानने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. याप्रमाणेच त्याच्यातील सूत्रसंचालनाची चुणूकही त्याने ‘बिग बॉस’ आणि ‘ दस का दम’ या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमधून दाखविली आहे. मध्यंतरी सलमान छोट्या पडद्यापासून दूर गेला होता. मात्र आता तो पुन्हा छोट्या पडद्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘रेस ३’ चित्रपटाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत तो छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘सोनी’ वाहिनीवरील ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोमधून सलमान पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ‘दस का दम’ या शोच्या पहिल्या दोन सीजनचे सूत्रसंचालनही त्यानेच केले होते.

वाचा : ‘राजी’च्या यशानंतरही मेघना गुलजार यांच्या डोळ्यात पाणी !

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, आतापर्यंत या शोचे दोन प्रोमो रिलीज झाले असून, ४ जून रोजी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आजपासून (गुरुवार) या शोच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

२००८ साली सुरु झालेल्या या रिअॅलिटी शोने केवळ दोन सीजन केल्यानंतर सलमान ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणात व्यग्र होता. या कारणामुळे ‘दस का दम’ हा शो काही काळासाठी थांबविण्यात आला होता. मात्र, आता सलमानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आताच्या सीजनला पुन्हा एकदा तोच प्रतिसाद मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 1:59 pm

Web Title: salman khans new show going to on air on june 4
Next Stories
1 सलमानच्या ‘भारत’ला ‘दिशा’ गवसली!
2 ‘पोरस’, ‘महाकाली’ मालिकांच्या सेटला आग, संपूर्ण सेट जळून खाक
3 ‘राजी’च्या यशानंतरही मेघना गुलजार यांच्या डोळ्यात पाणी !
Just Now!
X