News Flash

सलमानची आणखी एक तथाकथित प्रेयसी क्रिकेटरशी वाढवतेय जवळीक

हा क्रिकेटपटू भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे.

सलमान खान

मनोरंजन विश्वातील झगमगाटीच्या दुनियेत कोणतीच गोष्ट कायमस्वरुपी टिकून राहत नाही. आज एकमेकांचे मित्र म्हणून सांगणारे सेलिब्रिटी लगेच एकमेकांचे शत्रू कधी होतील तसेच, अनेक पार्टींमध्ये कपल म्हणून फिरणारे जोडपे विभक्त झाल्याचे वृत्त कधी येईल याची शाश्वती देता येत नाही. आता अभिनेता सलमान खानचेच घ्या ना. आजवर सलमानसोबत अनेक अभिनेत्रींचे नाव जोडले गेले. मात्र, अजूनही हा अभिनेता ‘बॅचलर स्टेटस’ घेऊन फिरतोय. काही दिवसांपूर्वीपर्यंत लुलिया वंतूर हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जात होते. पण लुलिया आता माजी क्रिकेटपटूशी जवळीक वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव कळलं का?

‘स्पॉटबॉय डॉट कॉम’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हा माजी क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नाही तर मोहम्मद अझरुद्दीन आहे. विशेष म्हणजे, अझरुद्दीन हा सलमानची पूर्वप्रेयसी संगीता बिजलानी हिचा पूर्वाश्रमीचा पती आहे. ‘टी १० लीग’मधील सोहेलच्या ‘मराठा अरेबियन्स’ या क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी अझरुद्दीन आणि लुलिया सध्या दुबईला गेले आहेत. तेथे या तिघांनी पार्टीत बरीच धम्माल केल्याचे ‘स्पॉटबॉय’ने म्हटले.

वाचा : ‘एस दुर्गा’नंतर आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात

खान कुटुंबाच्या गेल्या काही पार्टींमध्ये संगीता बिजलानी न येण्यामागे कारण लुलिया असल्याची चर्चा होती. या दोन्ही सौंदर्यवतींमध्ये फार काही चांगली मैत्री नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. गेल्याच आठवड्यात बिना कक यांच्या पुस्तकाचे वांद्र्यातील ताज लॅण्ड एण्डमध्ये प्रकाशन झाले. यावेळी खान कुटुंब आणि कतरिनासह संगीतासुद्धा उपस्थित होती. मात्र, या कार्यक्रमाला लुलियाने जाणे टाळले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:49 pm

Web Title: salman khans rumoured girlfriend iulia vantur is bonding with this cricketer
Next Stories
1 ‘विरुष्का’चा हनिमून लाहोर आणि कराचीमध्ये; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
2 VIDEO : खिलाडी कुमार म्हणतोय, ‘पाहायला विसरु नका…. देवा’
3 पुनरागमन करु इच्छिणाऱ्या कपिलच्या मार्गातील ‘हा’ अडथळा माहितीये?
Just Now!
X