X
X

..म्हणून सलमानने शाहरुखला कडेवर उचललं!

'रेस ३' च्या दिवशीच शाहरुख खानचा 'झिरो' या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानचा बहुचर्चित ठरलेला चित्रपट ‘रेस ३’ उद्या (शुक्रवारी) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर, टीझर आणि त्यातील गाण्यांनी प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. मात्र आताही उत्सुकता लवकरच संपुष्टात येणार असून चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एक नवा आश्चर्याचा धक्काही बसणार आहे. ‘रेस ३’ च्या दिवशीच शाहरुख खानचा ‘झिरो’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी यातील एक गाणं व्हायरल झालं आहे.

बॉलिवूडमधील दोन्ही खान म्हणजेच सलमान आणि शाहरुख यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे ते दोघं एकत्र कोणत्याही चित्रपटात झळकतील अशी साधी आशाही कोणी करत नाही. मात्र या सा-यावर पडदा पडला असून  व्हायरल झालेल्या गाण्यामध्ये  सलमान आणि शाहरुख एकत्र थिरकताना दिसून येणार आहेत. विशेष या गाण्यात सलमानने नव्या अंदाजात एन्ट्री केली असून त्याने चक्क शाहरुख खानला कडेवर उचलून घेतलं आहे.

झिरोमधील व्हायरल होत असलेलं हे गाणं ‘रेड चिली एन्टरटेन्मेंट’ने प्रदर्शित केला असून या व्हिडिओमध्ये सलमान आणि शाहरुख एकत्र ठुमके देत आहेत. तसेच त्यांच्याबरोबर कॅटरिना आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्रीही झळकणार आहेत. या गाण्यात सलमान आणि शाहरुख एकत्र डान्स करत असल्यामुळे त्यांच्या नात्यातील तणाव कोठेतरी कमी होत असल्याची चिन्ह दिसून येत आहे.

 

‘झिरो’ हा चित्रपट वर्षाअखेरीस म्हणजे २१ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याचा प्रदर्शत झालेल्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली होती. त्यातच ‘रेड चिली’ने हा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. सध्या हा व्हिडिओ  ट्रेंडिंगमध्ये टॉप वर असल्याचं दिसून येत आहे.

22
First Published on: June 14, 2018 12:56 pm
Just Now!
X