News Flash

करोनाची लागण झाल्यानंतर अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचं निधन

सोशल मीडियावरून दिली माहिती

देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनाच्या विषाणूत झालेल्या बदलांमुळे करोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढतोय. अशात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटींनी देखील आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना करोनामुळे गमावलंय.

अभिनेत्री संभावना सेठवर देखील दु:खाचा डोंगर कोसळलाय. संभावना सेठच्या वडिलांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून संभावनाचे वडील करोनाशी झुंज देत होते. संभावनाने सोशल मीडियावरून वडिलांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शनिवारी रात्री संभावनाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

संभावनाने सोशल मीडियावरून वडिलांच्या निधनाची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती म्हणाली, ” आज संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी संभावनाने तिच्या वडिलांना गमावलं. हृदय विकाराचा झटका आल्याने वडिलांचं निधन झालं.कृपया तुमच्या प्रार्थनेत त्यांना स्थान द्या.” अशी पोस्ट शेअर केलीय. संभावनाचे पती अविनाथ यांनी ही पोस्ट शेअर केलीय.

संभावनाच्या वडिलांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये बेड उपलब्ध होत नव्हता. सोशल मीडियावरून संभावनाने मदत मागितली होती. त्यानंतर दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र करोनाची दोन हात करत असताना त्यांचं निधन झालं.

संभावनाच्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्र मैत्रिणींनी शोक व्यक्त केलाय. तसचं तिचं सांत्वन केलंय. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला करोनामुळे गमावलंय. नुकतच निक्की तांबोळीच्या भावाचं करोनामुळे निधन झालंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 9:58 am

Web Title: sambhavana seth father passed away due to corona and cardiac arrest kpw 89
Next Stories
1 “भावाचं नुकतच निधन होऊनही तू मजा करतेयस?”; ट्रोल करणाऱ्यांना निक्की तांबोळीने फटकारलं
2 सिनेछायाचित्रकार  मुणगेकर यांचे निधन
3 शाहरूख आणि भन्साळी  पुन्हा एकत्र काम करणार
Just Now!
X