20 November 2019

News Flash

Photo : समीरा रेड्डीला कन्यारत्न!

समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे

समीरा रेड्डी

अंडरवॉटर फोटोशूट केल्यामुळे काही दिवसापूर्वी चर्चेत आलेली अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई झाली आहे. शुक्रवारी (१२ जुलै )समीराच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. ही माहिती समीराने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यासोबतच तिने तिच्या मुलीचा एक फोटोही शेअर केला आहे. यापूर्वी समीराला एक लहान मुलगा आहे.

‘आज सकाळी आमच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं आहे’, असं म्हणत समीराने तिच्या लहान बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. समीराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर मोठ्या संख्येने शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

Our little angel came this morning My Baby girl ! Thank you for all the love and blessings#blessed

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

दरम्यान, काही दिवसापूर्वी समीराने ९ व्या महिन्यामध्ये अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूट केलं होतं. त्यानंतर तिने नो मेकअप असलेला एक व्हिडीओही शेअर केला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रचंड चर्चा रंगली होती. समीराने २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, तिचं फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. त्यानंतर तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे वळविला. तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

First Published on July 12, 2019 3:05 pm

Web Title: sameera reddy blessed with a baby girl sameera share photo on social media ssj 93
Just Now!
X