News Flash

‘इस्लाम’साठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने निकाहनंतर केली पहिली पोस्ट

तिने मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला आहे.

अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. या चर्चा तिने निकाह केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. ‘इस्लाम’साठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने एका पोस्टमध्ये पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये सना अतिशय सुंदर दिसत आहे.

सनाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती पती मौलाना मुफ्ती अनससोबत दिसत होती. आता खुद्द सनाने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्नाबाबत माहिती दिली आहे. या फोटोमध्ये सनाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. त्यावर तिने साजेशी ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकमध्ये सना अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

सनाने २० नोव्हेंबर रोजी गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्रीसोडत असल्याचे सांगितले होते. आता सनाने निकाह केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 5:25 pm

Web Title: sana khan first post after marriage avb 95
Next Stories
1 भारतीचे पाच वर्षांपूर्वीचे ड्रग्ज संबंधीत ट्विट पुन्हा चर्चेत, नेटकरी म्हणाले…
2 कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला न्यायालयीन कोठडी
3 रसिका सुनीलने गायलेल्या ‘या’ गाण्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद
Just Now!
X