अभिनेत्री सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हिन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असा आरोप सनाने केला. या आरोपांवर "बुलाती है मगर जाने का नहीं" असं प्रत्युत्तर लुईसने दिलं होतं. यावर आता पुन्हा एकदा सनाने प्रतिक्रिया दिली आहे. अवश्य पाहा - १०वी पास असलेल्यांसाठी ‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ४५ हजार पगार अवश्य पाहा - अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक काय म्हणाली सना खान? "बुलाती है मगर जाने का नहीं" असं बोलणाऱ्या मेलव्हिनला "जाने का है पर कोई बुलाता नहीं" असं उत्तर सनाने दिलं आहे. सनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाकिर खानचा आहे. खरं तर हा एक प्रकारचा मीम्स आहे. याच मीम्सच्या माध्यमातून सनाने मेलव्हिनवर उपरोधिक टीका केली आहे. View this post on Instagram Reality Strictly for Delusional ones Chillata hai magar darne ka nahin Happy Valentine’s Day all 50% truth prevailed rest will also soon . . . . . #fact #reality A post shared by Sana Khaan (@sanakhaan21) on Feb 13, 2020 at 9:42pm PST View this post on Instagram For the win . . . #BulatiHaiMagarJaaneKaNahi #Lapeto #TruthWillPrevail A post shared by Melvin Louis (@melvinlouis) on Feb 12, 2020 at 3:19am PST यापूर्वी काय म्हणाली होती सना खान? View this post on Instagram This is my first n it has taken a lot of courage from me to come out n speak the truth. Coz there were so many people who believed in this relation n showed so much love n respect but unfortunately I didn’t get it from where I should have gotten. This man is dirt n he is disgusting unfortunately it took me a year to find out coz I believed in him blindly. I have taken a stand for myself coz if I won’t no one will He is a compulsive cheater n a compulsive liar n this is his regular thing to do with everyone for his fame n popularity. This is the original content with no fabrication but be ready for the covers on this Ps: cheated on me with multiple girls since may/June which I lately discovered but there is one girl tht shocked me the most n I knw her #shameonyou miss **** I will def tell the world ur name so atleast others knw u before they collab with you Upbringing matters a lot He wanted to marry me and have babies what would he teach my son n daughter??? #toxicrelationship #cheappeople A post shared by Sana Khaan (@sanakhaan21) on Feb 11, 2020 at 10:02pm PST “खरं तर पहिल्यांदाच मी आमच्या नात्याविषयी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे. खरं बोलायला खूप हिंमत लागते. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध होते. माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं” अशा आशयाची पोस्ट सनाने लिहिली होती.