01 October 2020

News Flash

करोनामुळे आली अभिनेत्रीवर कपडे धुण्याची वेळ; कपडे तुडवून व्यक्त केला राग

करोनामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत.

करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. दरम्यान घरात थांबून वैतागलेल्या अभिनेत्री सना खान हिने करोनावरील आपला राग चक्क कपड्यांवर काढला आहे.

सनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कपडे धुताना दिसत आहे. गंमतीशीर बाब म्हणजे तिने करोनावरील आपला राग चक्क कपड्यांना तुडवून व्यक्त केला आहे. “गो करोना गो. सर्व राग मी या कपड्यांवर काढत आहे.” असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

सनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तिची खिल्ली देखील उडवली आहे.

सना खान एक अभिनेत्री आहे. ‘ये है हाय सोसायटी’ या बी ग्रेड चित्रपटापासून तिने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘बॉम्बे टू गोवा’, ‘जय हो’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे सना खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. गेल्या काही काळात ती मेल्वन लुईससोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 1:14 pm

Web Title: sana khan starts crying during washing clothes mppg 94
Next Stories
1 Coronavirus : जगभरातील कलाकार एकत्र; ‘डब्ल्यूएचओ’ला करणार आर्थिक मदत
2 करोनापासून कसे तरी वाचू, पण…; अभिनेत्याला छळतोय एक प्रश्न
3 ‘देवा वाचव मला’; पत्नीसोबत ‘बिग बॉस मराठी २’ पाहण्यासाठी घाबरला पराग कान्हेरे
Just Now!
X