14 December 2019

News Flash

छोट्या पडद्यावरील संगीता कपुरेनं ‘जाणता राजा’मध्ये केलं होतं काम

'रामायण', 'देवों के देव महादेव', 'छोटी बहू' या मालिकांमध्ये संगीताने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

संगीता कपूरे

छोट्या पडद्यावर सामान्य व सोज्वळ सूनेच्या अंदाजात पाहायला मिळणारी अभिनेत्री संगीता कपुरे काही दिवसांपूर्वी तिच्या बोल्ड फोटोजसाठी चर्चेत आली होती. ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या संगीताने ‘जाणता राजा’ या नाटकातून प्रवास सुरू केला. याच नाटकामुळे तिला अभिनयात करिअर करण्याची प्रेरणा मिळाल्याचंही ती सांगते.

विविध मालिकांमध्ये भूमिका साकारणारी संगीता शास्त्रीय नृत्यांगना आहे. लहानपणापासून ती कथ्थक शिकली असून आताही आठवड्यातून किमान दोन दिवस तरी ती नृत्यासाठी काढते. पंडीत भीमाशंकर यांच्याकडून तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. नृत्याची मदत अभिनयातही होत असल्याचं तिने सांगितलं.

याच नृत्यामुळे ती ‘जाणता राजा’ या नाटकाशी जोडली गेली. त्यानंतर मिथुन चक्रवर्तींच्या ‘माँ कसम’ या चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. चित्रपटांपेक्षा संगीताने छोट्या पडद्यावर स्वत:ची छाप सोडली. ‘देवों के देव महादेव’, ‘छोटी बहू’, ‘कबूल है’, ‘रामायण’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या. तिने राजेश श्रृंगारपुरेसोबत ‘संघर्ष’ या मराठी चित्रपटातही भूमिका साकारली. भविष्यात वेब सीरिजमध्ये चांगली भूमिका मिळाल्यास साकारण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

First Published on July 19, 2019 6:04 pm

Web Title: sangeeta kapure worked in marathi play janata raja ssv 92
Just Now!
X