28 February 2021

News Flash

संजय दत्त कॅन्सरमुक्त; चाहत्यांचे मानले आभार

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ट्विट करत कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती दिली आहे. संजय दत्तने त्याच्या मुलांचा १०वा वाढदिवस साजरा करताना ही आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

“मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. पण असं म्हणतात ना, देव सर्वात ताकदवान सैनिकालाच सर्वात कठीण लढाई देतो आणि आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच, मी या लढाईवर विजय मिळवणा आहे. मला फार आनंद झाला आहे” असे संजय दत्तने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

संजय दत्तने त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे देखील आभार मानले आहेत. ‘तुमच्या सर्वांच्या विश्वास आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते’ असे त्याने म्हटले आहे.

संजय दत्तवर कोकिलाबेन रूग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम, तेथील स्टाफ आणि नर्स या सर्वांचा उल्लेख करत आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 4:15 pm

Web Title: sanjay dutt announces recovery from cancer abn 97
Next Stories
1 Photo : सोनाली बेंद्रेने शेअर केला फिटनेस फंडा
2 ‘माझ्या एलिमिनेशनसाठी सिद्धार्थ जबाबदार’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
3 बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण; शोविक चक्रवर्तीच्या कोठडीत वाढ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
Just Now!
X