16 February 2019

News Flash

Sanju: बायोपिकवर संजय दत्तची दुसरी पत्नीही नाराज

काही दिवसापूर्वीच संजयची मुलगी त्रिशाला नाराज असल्याचं पाहायला मिळाला.

संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केले असून आतापर्यत या चित्रपटाने सारे रेकॉर्ड तोडल्याचं पाहायला मिळत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या माध्यमातून संजय दत्तच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र या चित्रपटामध्ये संजयच्या जीवनातील काही ठराविक घटनाच दाखविण्यात आल्या असून काही घटनांना कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळेच काही दिवसापूर्वीच संजयची मुलगी त्रिशाला नाराज असल्याचं पाहायला मिळाला. त्रिशालाच्या नाराजीनंतर या चित्रपटामुळे आणखी एक व्यक्ती नाराज असल्याचं दिसून येत आहे.

‘डीएनए’च्या माहितीनुसार, ३०० कोटींच्या घरात प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या ‘संजू’मध्ये १९९३ साली झालेला बॉम्बस्फोट, त्याच्याशी असलेल्या संजयचा संबंध आणि कोर्ट-कचेरी या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच त्या काळात त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तीही दाखविण्यात आल्या. मात्र संजयची पहिली पत्नी रिचा शर्मा आणि दुसरी पत्नी रिया पिल्लई यांच्या साधा संदर्भही देण्यात आलेला नाही. याकारणामुळेच त्रिशाला दत्तने हा चित्रपट पाहण्यावर बहिष्कार घातला होता. तर संजयच्या दुसऱ्या पत्नीचाही समावेश नसल्यामुळे रिया पिल्लईनेही नाराजी व्यक्त केलं आहे.

‘संजयच्या बऱ्या-वाईट काळात मी त्याला प्रत्येक क्षणाला साथ दिली होती.मात्र तरीदेखील याचित्रपटामध्ये माझा थोडासा देखील उल्लेख करण्यात आलेला नाही’,  असं रिया म्हणाली. रिचा शर्माच्या निधनानंतर संजयने १९९८ मध्ये रिया पिल्लईबरोबर दुसरं लग्न केलं होतं. मात्र काही कारणांमुळे या दोघांनी २००८ साली कायदेशीररित्या घटस्फोट घेतला होता.

दरम्यान, या चित्रपटातील काही सीनला जरी कात्री लावण्यात आली असली तरी हा चित्रपट बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर संजयच्या पदरात सहा-सात नवे चित्रपट पडल्याचंही सांगण्यात येत आहे.

First Published on July 12, 2018 12:00 pm

Web Title: sanjay dutt ex wife rhea pillai watched sanju and shocked