20 January 2019

News Flash

संजय दत्तने दुबईत घेतली मुलीची भेट

बाप- लेकी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं व्यावसायिक आयुष्य जेवढं चर्चिलं गेलं नाही त्याहून जास्त चर्चा त्याच्या खासगी आयुष्याची झाली. १९९३ बॉम्ब स्फोटात त्याचे नाव अडकल्यानंतर त्याच्या आयुष्यात पुर्वीसारखे काहीच राहिले नाही. या सगळ्यात संजयच्या कुटुंबाला फार सहन करावे लागले होते. पण आता त्याच्या आयुष्यात सर्वकाही चांगले होताना दिसत आहे.

संजयच्या कठीण प्रसंगात त्याची तिसरी पत्नी मान्यता आणि मुलगी त्रिशाला दत्त यांनी त्याची साथ कधीच सोडली नाही. या दोन स्त्रियांचा त्याच्या आयुष्यावर फार प्रभाव असल्याचे त्याने अनेकदा मान्यही केले आहे. संजय त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत मुंबईत राहत असला तरी त्याची पहिली मुलगी त्रिशाला अमेरिकेत राहते. हे बाप- लेकी नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संजय दत्त त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दुबईला गेला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्रिशालाही होती. संजयची पत्नी मान्यता सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. ती दरदिवशी काही ना काही पोस्ट शेअर करत असतेच. यावेळीही तिने नवीन वर्षाच्या पार्टीचे फोटो शेअर केले. यातील एका फोटोमध्ये त्रिशालाही दिसत आहे. तसेच मुलगी इक्रा आणि मुलगा शहरानही आहेत.

‘दी दत्त…’ असे कॅप्शन मान्यताने या फोटोला दिले. संजूबाबाने मान्यतासोबत लग्न केल्यानंतर त्रिशाला आणि तिच्यातील नाते काही चांगले नसल्याच्या चर्चा होत्या. या दोघींमध्ये बऱ्याचदा खटके उडत असल्याचे म्हटले जायचे. पण आता त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा राहिला नसून, दोघीही चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वीच मान्यता त्रिशालाला भेटण्यासाठी न्यू यॉर्कला गेली होती. त्यावेळी त्रिशालाने दोघींचा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे या माय-लेकीच्या नात्यात सर्वकाही आलबेल असल्याचं दिसून आलं. दरम्यान, मान्यताने एका मुलाखतीत त्रिशालाने भारतात परत यावं अशी इच्छा व्यक्त केलेली. कारण, त्रिशाला परत येईल तेव्हाच त्यांच कुटुंब पूर्ण होईल असं मान्यताच मत आहे. लवकरच, संजय ‘साहेब, बीवी आणि गँगस्टर ३’ आणि ‘टोरबाज’ या सिनेमांत दिसणार आहे.

First Published on January 2, 2018 12:48 pm

Web Title: sanjay dutt reunite with trishala wife maanayata shared family picture