29 September 2020

News Flash

K.G.F 2: पुन्हा साम्राज्य निर्माण करणं सोप्प नाही, संजय दत्तनं शेअर केला पहिला पोस्टर

चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

‘केजीएफ चॅप्टर १’ हा आजवरच्या सर्वोत्कृष्ट दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सुपरस्टार यश अभिनित ‘केजीएफ’ने केवळ तीन आठवड्यात जवळपास २५० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

अक्षयने पत्नीला दिलं आजवरचं सर्वात महागडं गिफ्ट, पाहा फोटो

या चित्रपटाचे नाव ‘केजीएफ चॅप्टर २’ असे आहे. हा पहिल्या भागाचा सिक्वल आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नुकताच संजयने चित्रपटाचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला. याआधीही संजयने सिनेमातील त्याचा लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

Video: उदित नारायण यांच्या मुलाने घातली नेहा कक्करला लग्नाची मागणी

संजय दत्तने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता यश निळ्या शर्टमध्ये आणि काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. तो इतर कामगारांबरोबर एक भलामोठा लाकडाचा ओंडका ओढताना दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना संजयने लिहिले की, “साम्राज्याची पुर्ननिर्मिती करणं सोप्प नसतं”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 3:17 pm

Web Title: sanjay dutt the first look kgf chapter 2 on his social media mppg 94
Next Stories
1 Video: उदित नारायण यांच्या मुलाने घातली नेहा कक्करला लग्नाची मागणी
2 ‘बॉण्ड गर्ल’चं निधन, ‘त्या’ न्यूड सीनमुळे झाली होती प्रसिद्ध
3 तरुणाईच्या कलाविष्काराला रसिकांची हाऊसफुल्ल दाद
Just Now!
X