26 October 2020

News Flash

उपचारासाठी विदेशात जाण्यापूर्वी संजूबाबा करणार ‘हे’ काम

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला त्यांच्या घरी १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शस्त्र सापडल्यानं ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्तने सोशल मीडिया पोस्टद्वारे कामातून ब्रेक घेत असल्याचे सांगितले. पण संजय दत्तने हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान संजय दत्ताला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले. त्यामुळे कलाविश्वातील सर्वांनाच हादरा बसला. तसेच चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वचजण संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. संजय दत्त लवकरच उपचरासाठी अमेरिकेला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापूर्वी संजय दत्त एक काम करणार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी ‘सडक २’ चित्रपटाचे डबिंग पूर्ण करणार आहे. ‘ब्रेक घेण्यापूर्वी संजय दत्त चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण करणार आहे. त्याचे थोडे काम बाकी आहे आणि त्याला ते पूर्ण करण्याची इच्छा आहे’ असे म्हटले आहे.

८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. आता तो उपचारासाठी परदेशात जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्याची भेट घेतली. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संजय दत्त लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 8:43 am

Web Title: sanjay dutt to finish adak 2 dubbing before flying to us avb 95
Next Stories
1 सुशांतने अंकितासाठी खरेदी केला होता कोट्यवधींचा फ्लॅट; दर महिन्याला भरत होता EMI
2 किसिंग सीनमुळे बिपाशा बासू पडायची आजारी; सांगितला चकित करणारा अनुभव
3 सुपरस्टार विजयच्या चाहत्याने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी केलं होतं हे ट्विट
Just Now!
X