News Flash

भन्साळींनी ‘पद्मावत’साठी माझ्या नावाचा विचार केला होता, कंगनाचा दावा

या चित्रपटात दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत होती.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर वादग्रस्त टीका करून नेहमीच चर्चेत राहणारी कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संजय लीला भन्साळींच्या सुपरहिट चित्रपटातील भूमिकेसाठी आपल्या नावाचा विचार केला होता असं कंगना एका मुलाखतीत म्हणाली.

२०१८ साली ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहीद कपूर, अदिती राव हैदरी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत होती. ‘पद्मावतमध्ये मी काम करावं अशी संजय लीला भन्साळींची इच्छा होती. मला स्क्रिप्टही वाचून दाखवण्यात आली होती. मात्र यासंदर्भातलं बोलणं पुढे गेले नाही यानंतर मी मणिकर्णिकामध्ये व्यग्र झाले ‘ असं कंगना मुलाखतीत म्हणाली.

इतकंच नाही तर ‘रामलीला’ चित्रपटातील एक गाणं मी करावं अशीही भन्साळींची इच्छा होती. नंतर हे गाणं प्रियांका चोप्रावर चित्रीत करण्यात आल्याचंही तिनं या मुलाखतीत सांगितलं. सध्या कंगना राणौत ही ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. राजकुमार रावची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे.  या चित्रपटाबरोबरच ‘पंगा’ हा तिचा चित्रपटही याच वर्षांत प्रदर्शित होत आहे. कंगना तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्येही मुख्य अभिनेत्री म्हणून करणार आहे. या चित्रपटासाठी तिनं २४ कोटी इतकं मानधन आकारल्याचंही म्हटलं जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 4:22 pm

Web Title: sanjay leela bhansali offered padmavat to me kangana ranaut reveals
Next Stories
1 …त्या घटनेमुळे राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील मैत्री कायमची संपली
2 ‘टिकटॉक’वरुन लोकप्रिय झाली अन् थेट चित्रपटाची ऑफर मिळाली
3 Avengers Endgame : प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट
Just Now!
X