22 January 2021

News Flash

“बोल्ड सीन शूट करणं फार अवघड असतं पण…”; आदित्यसोबतच्या ‘त्या’ सीनविषयी सान्याचा खुलासा

'लुडो'मधील सान्या- आदित्यच्या सीनविषयी सोशल मीडियावर चर्चा

आपल्या कसदार अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणजे सान्या मल्होत्रा. दंगल चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी सान्या अलिकडेच ‘लुडो’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात सान्याने अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील सान्या आणि आदित्यचा बोल्ड सीन सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. हा सीन नेमका कसा चित्रीत झाला आणि त्यावेळी सान्याची नेमकी अवस्था कशी झाली होती हे तिने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

“लुडो चित्रपटात मी आदित्यसोबत काम करणार हे मला समजल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं. विशेष म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाला. मात्र, आदित्यसोबत या चित्रपटात माझे बोल्ड सीन असल्याचं लक्षात आल्यानंतर मला फार अवघडल्यासारखं झालं होतं”, असं सान्या म्हणाली.

पुढे ती म्हणते, “बोल्ड सीन देताना मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं, कारण आजुबाजूला बरेच लोक होते, कॅमेरा होता त्यामुळे मी फार नर्व्हस झाले होते. एक तर मी यापूर्वी आदित्यला फारशी ओळखत नव्हते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हे बोल्ड सीन देताना त्याने मला फार कंफर्टेबल केलं. माझ्या मनातील भीती आणि अवघडलेपणा त्याने कमी करण्यास मदत केली”.

‘लुडो’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील लग्नाआधीची सान्या आणि आदित्यची सेक्सक्लीप सोशल मीडियावर व्हायरल होते. आणि ही क्लीप सोशल मीडियावरुन काढून टाकण्याच्या मिशनसाठी ते दोघं एकत्र येतात असं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि सान्या मल्होत्रासोबतच, पंकज त्रिपाठी, अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख, रोहित शराफ, आशा नेगी या कलाकारांनी काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:28 pm

Web Title: sanya malhotra says its difficult for me to shoot bold scene but aditya roy kapoor make me comfortable in film ludo ssj 93
Next Stories
1 राजकुमार-नुशरतने DDLJ मधील गाणं केलं रिक्रिएट; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
2 “या चित्रपटामुळे करिअर संपलं”; ट्रकवरील पोस्टर पाहून ट्विंकल संतापली
3 KBC 12: ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
Just Now!
X