News Flash

सपना चौधरी थोडक्यात वाचली

सुदैवाने सपना आणि तिच्या कार चालकाला दुखापत झालेली नाही

हरयाणामधील लोकप्रिय गायिका आणि डान्सर सपना चौधरी सुदैवाने रस्ते अपघातातून वाचली आहे. गुरुग्राम येथे तिच्या कारचा अपघात झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास खरेदी करुन सपना परतत असताना सपनाच्या गाडीला भरधाव कारने टक्कर दिली. पण सुदैवाने सपना आणि तिच्या कार चालकाला दुखापत झाली नाही.

सपनाने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. स्थानिकांच्या मते, कारची टक्कर झाल्यानंतर सपनाच्या गाडी चालकाने गाडी थांबवली पण दुसऱ्या गाडीचा चालक तेथून फरार झाला. त्यामुळे गाडीचा नंबर आणि गाडीचा चालक कोण आहे अद्याप कळालेले नाही.

या अपघातामध्ये सपनाच्या गाडीचे नुकसान झाले आहे. सपनाने अद्याप या विरोधात पोलिसात तक्रार केलेली नसून तिने तक्रार करताच या विरोधात करावाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक मुकेश यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:10 pm

Web Title: sapna choudhary escapes a near fatal accident in gurugram after a high speed car hit her vehicle avb 95
Next Stories
1 या चित्रपटातून चंकी पांडे करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
2 “इस बार सामने गब्बर हो या शाकाल हम भी देखेंगे”; बिग बींच्या पोस्टवर अनुरागची प्रतिक्रिया
3 संघाच्या नावाने खडे फोडणं थांबवा; केआरकेचं मुस्लिमांना आवाहन
Just Now!
X