आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘सपना है सच है’ असे या गाण्याचे बोल असून अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात सदाशिवराव पेशवा व पार्वतीबाईंच्या विवाहाचे क्षण चित्रीत करण्यात आले आहे.
अभय जोधापुरकर आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे सुंदर गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे. जावेद अख्तर यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. सदाशिवराव व पार्वतीबाई यांचे पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाहसोहळा पार पडत असल्याचं या गाण्यात पाहायला मिळत आहे. अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात याचे शूटिंग करण्यात आले आहे.
मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आधारित आहे. अर्जुन, क्रितीसोबतच संजय दत्त यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. संजय दत्त यात अहमद शाह अब्दालीची साकारत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 2:12 pm