आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. सत्तर ते ऐंशीच्या दशकात शर्मिला यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यावेळी त्या टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये होत्या. शर्मिला यांची नात असल्यामुळे अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान स्वत:ला भाग्यवान समजते. साराने एका मुलाखतीमध्ये याबाबत वक्तव्य केले होते.
अभिनेत्री सारा अली खानचे आजी शर्मिला टागोर यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. नुकताच तिने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या बाबत वक्तव्य केले आहे. ‘माझी आजी सर्वांशी आदराने बोलते. ती खूप मस्त आहे. ती अतिशय प्रेमळ आणि सर्वांची आवडती आजी आहे. जेव्हा मी आजीचा आराधना आणि मेरे सपनों की रानी हा चित्रपट पाहीला तेव्हा मला असे वाटले की ही खरच माझी आजी आहे का? कारण ती कमाल आहे. ती एक स्टार आहे’ असे सारा म्हणाली.
आणखी वाचा : …म्हणून शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर एका रात्री उतरवण्यात आले
त्यानंतर साराला मुलाखतीमध्ये आईशी संबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या आईने वयाच्या १६ व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम केले. तिने सत्यजीत रे यांच्यासोबत जवळपास ४ ते ५ चित्रपट केले आहेत. माझ्या आईचा अभिनय त्यांना प्रचंड आवडायचा.’
काही दिवसांपूर्वी साराचा कूली नं. १ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. त्यानंतर आता ती अक्षय कुमारसोबत ‘अतरंगी रे’ या चित्रपटात काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरील फोटो तिने शेअर केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 10:55 am