‘निरजा’ , ‘एअर लिफ्ट’ , ‘तलवार’ , ‘मेरी कोम’ अशा वेगळ्या विषयावरील चित्रपटाना प्रेक्षकांनी स्वीकारले त्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे असे मत दिग्दर्शक ओमंग कुमार याने व्यक्त केले. “सबरजीत” या चित्रपटाच्या निमित्ताने ओमंग कुमार याची त्याच्या अंधेरीतील कार्यालयात भेट घेतली तेव्हा तो सांगत होता. ओमंग कुमारने पुढे सांगतले, रणदीप हुडाला मी सबरजीतच्या भूमिकेसाठी वजन कमी करावे लागेल व घरातच एक छोट्या जेलसारखे वातावरण करावे लागेल हे सांगितले.त्याने त्यासाठी तयारी देखिल दाखवली हे महत्वाचे. तो पुढे म्हणाला, ‘मेरी कोम’ नंतर आपण चित्रपटाची निर्मिती करायची नाही असे मी ठरवले होते. पण सबरजीत चित्रपटाची पटकथा मी वाचली तेव्हा या संघर्षमय विषयावर चित्रपट निर्मिती करायची आवश्यकता आहे असे मला वाटले. मी पुन्हा नव्याने या पटकथेवर काम करताना त्यात दलजीत कौरच्या भुमिकेसाठी ऐश्वर्याचाच विचार होऊ शकतो असे मला मनोमन पटले. या भूमिकेत तिचे अगदी वेगळे रूप पाह्यला मिळेल. हा एका वास्तवाची जाणिव करून देणारा चित्रपट असून त्याचे कथासूत्र न सांगणे योग्य.पण पटकथेवर भरपूर काम केल्याने नियोजित वेळेपूर्वी चित्रपट पूर्ण झाला हे मी आवर्जुन सांगेन असे ओमांग कुमारने गप्पा संपवताना सांगितले.