News Flash

सरस्वती आणि देवाशिषचं लग्न होणार?

देवाशिष आणि सरस्वती एकमेकांचे केवळ मित्र असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरस्वती

देवाशिष आणि सरस्वती एकमेकांचे केवळ मित्र असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनूला सरस्वतीच्या रुपात तिची आई परत मिळू शकते या विचाराने हे दोघं लग्न करत आहेत. राघवची सरू म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी सरस्वती कैकालीमध्ये परतते. सरस्वती कैकालीमध्ये परतली पण तिची आणि मोठ्या मालकांची भेट काही होऊ शकली नाही. गेल्या काही भागांमध्ये बऱ्याच घटना घडल्याचे पाहायला मिळाले.

वाचा : घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?

सरस्वतीचे हरवणे, त्यानंतर तिचे कैकालीमधील वाड्यात येणे, दुर्गाला सरस्वती समजणे ज्यामुळे प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळाला. सरू कैकालीमधील भैरवकरांच्या वाड्यामध्ये येऊनदेखील तिला काहीच आठवले नाही, ना तिला कोणी बघितले. त्यामुळे राघव आणि तिची भेट होता होता राहिली आणि दुर्गा पुन्हा वाड्यामध्ये आली. या आठवड्यामध्ये देवाशिष आणि सरस्वतीचे लग्न होणार असून ते निर्विघ्नपणे पार पडू शकेल का ? भुजंग कोणता नवा खेळ खेळेल ? राघव सरस्वतीपर्यंत पोहचू शकेल का ? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.

वाचा : अभिनेत्रीच्या फोटोवर आरटीओ अधिकाऱ्याची अश्लील कमेंट

सरस्वती आणि देवाशिषचे लग्न होत असतानाच भुजंग खूप मोठं नाटक रचतो. सरस्वती ही त्याची पत्नी असून, गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो तिच्या शोधात असल्याचे देवाशिष, त्याचे संपूर्ण कुटुंब आणि सरस्वतीला पटवून देण्यात भुजंग यशस्वी ठरतो. हे ऐकून धक्का बसलेल्या सरस्वतीला तिचा भूतकाळ आठवेल का? ती भुजंगसोबत वाड्यामध्ये जाण्यास तयार होईल का ? आणि जर ती वाड्यामध्ये जाण्यास तयार झाली तर सरस्वती आणि राघव यांची भेट होईल का ? दुर्गा आणि सरस्वती समोरासमोर येतील का ? हे सगळं तुम्हाला सरस्वती मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 4:16 pm

Web Title: saraswati serial devashish and saraswati will get married
Next Stories
1 घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?
2 ‘या’ महिला स्टार टेनिसपटूच्या आयुष्यावर रोहित शेट्टी साकारणार बायोपिक?
3 अभिनेत्रीच्या फोटोवर आरटीओ अधिकाऱ्याची अश्लील कमेंट
Just Now!
X