23 January 2020

News Flash

‘ससुराल सिमर का’ मालिकेतील बालकलाकाराचा अपघाती मृत्यू

'संकटमोचन हनुमान' व 'ससुराल सिमर का' या मालिकांतील शिवलेखने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.

शिवलेख सिंग

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’मधील बालकलाकार शिवलेख सिंग याचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात शिवलेखचे आई-वडील व त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रायपूर येथील धारसिवा परिसरात गुरुवारी शिवलेखच्या कारचा अपघात झाला. तो १४ वर्षांचा होता.

दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. शिवलेख आईवडिलांसोबत रायपूरहून बिलासपूरला जात होता. त्यांच्या कारला ट्रकची धडक लागल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई लेखना गंभीर जखमी आहे. वडील शिवेंद्र सिंह व त्यांच्यासोबत असलेले नवीन सिंगसुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचा ड्राइव्हर गाडी घटनास्थळीच सोडून पळाला. ड्राइव्हरचा शोध पोलीस घेत आहेत.

शिवलेखने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यापैकी ‘संकटमोचन हनुमान’ व ‘ससुराल सिमर का’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने काही रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. शिवलेखच्या अकस्मात मृत्यूने कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

First Published on July 19, 2019 11:33 am

Web Title: sasural simar ka child actor shivlekh singh dies in car accident ssv 92
Next Stories
1 ”बिग बॉस’च्या घरात सेक्सशिवाय १०० दिवस कशी राहशील?’
2 Video : ‘मी असा लढलो’, शरद पोंक्षेंनी उलगडली कर्करोगासोबतची झुंज
3 ‘सेक्रेड गेम्स २’, अक्षय कुमार, जॉनशी टक्कर टाळण्यासाठी प्रभासने घेतली माघार
Just Now!
X