30 October 2020

News Flash

पाच वर्षांनंतर अभिनेत्री सोडणार ‘भाबीजी घर पर है’ मालिका, निर्माते म्हणाले…

मालिकेतील हे पात्र विशेष चर्चेत असायचे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘भाबीजी घर पर है.’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच मालिकेतील प्रत्येक पात्र हे सतत चर्चेत असते. अनिता भाबी हे पात्र साकारणारी सौम्या टंडन विशेष चर्चेत असते. पण आता अनिता भाबीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने मालिका सोडण्यावर मालिकेच्या निर्मात्या बेनिफर कोहलीने वक्तव्य केले आहे.

नुकताच एका मुलाखतीमध्ये बेनिफर यांनी सौम्या ‘भाबीजी घर पर है’ मालिका सोडत असल्याचे म्हटले आहे. ‘मालिका तर सुरु ठेवायला हवी. सौम्या ही माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. ती तिच्या कामात अतिशय हुशार आहे आणि तिच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि भविष्यात आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करु. तिने गेली अनेक वर्षे या मालिकेत भूमिका साकारली आहे आणि आता ती माझी जवळची मैत्रीण आहे’ असे बेनिफर म्हणाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Looking for rainbow moments in life. #happy #throwbackthursday aah it’s Wednesday haha it rhymes let’s make it Thursday today.

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_) on

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला तिची खूप आठवण येईल. तसेच आमच्या दोघींमध्ये चागंले मैत्रीचे नाते असल्यामुळे मी तिला तिच्या जागी मालिकेत कोणती अभिनेत्री भूमिका साकारु शकते असेही विचारले आहे. तिने गेली बरीच वर्षे माझ्यासोबत काम केले त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते.’

गेल्या पाच वर्षांपासून सौम्या भाबीजी घर पर है या मालिकेत भूमिका साकारत आहे. ‘माझ्या आयुष्यातील भाबीजी या मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. कोहली आणि संजय जी हे खूप चांगले निर्माते आहेत. त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. मी आणि बेनफिर खूप चांगल्या मैत्रीणी आहोत’ असे सौम्याने मालिकेविषयी बोलताना म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:45 pm

Web Title: saumya tandon quits bhabiji ghar par hain after 5 years avb 95
Next Stories
1 साराच्या ‘कुली नं.१’ चित्रपटावर मीम्सचा पाऊस
2 राजस्थानला जाण्यासाठी यूजरने मागितली कार, सोनू सूदने दिले भन्नाट उत्तर
3 “साराने अक्षरश: माझ्यासमोर हात जोडले होते,” रोहित शेट्टीचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X