१५१ व्या जयंतीच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खान याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन केलं. “वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका” असं म्हणत त्याने संपूर्ण देशाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. परंतु त्याच्या या ट्विटवर अभिनेत्री सयानी गुप्ता हिने टीका केली आहे. “गांधीजींनी आपल्याला खरं बोलायला देखील शिकवलंय” असं म्हणत तिने शाहरुखला उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

“या गांधी जयंतीला आपण आपल्या मुलांना अशी गोष्ट शिकवूया जी चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रसंगांमध्ये त्यांना मदत करेल. वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका हे गांधीजींचं तत्व आपल्या मुलांना शिकवा.” अशा आशयाचं ट्विट शाहरुखने केलं होतं. मात्र त्याचं हे ट्विट अभिनेत्री सयानीला आवडलं नाही. “सत्य बोलणं चांगलं आहे, पण गांधीजींनी आपल्याला सत्य बोलणाऱ्यांना पाठिंबा द्यायला देखील शिकवलं आहे. पीडितांसाठी आवाज उठवा, दलितांच्या हक्कांसाठी लढा. केवळ डोळे बंद करुन शांत बसू नका.” अशा आशयाचं ट्विट करुन सयानीने शाहरुखला उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा

महात्मा गांधी हे नाव घेतले की, भारतीय स्वातंत्र्यलढा डोळ्यासमोर येत असला तरी गांधी फक्त स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते. गांधींनी समाजात विचारांचा पायाही रचला. सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश देत सत्याग्रहाच्या मार्गाने समाजाला संघटित केले. जनभावनेचा आदर राखून आपले विचार मांडण्याच्या गांधींच्या वृत्तीनेच हे शक्य झाले. सत्य, अहिंसा आणि प्रेम याद्वारे पुढे जाणारा समाजच अधिक प्रगत समाज असू शकतो हे त्यांचे मत होते. गांधी भारतात रामराज्याची कल्पना करत होते. पण त्यांची रामराज्याची कल्पना वेगळी होती. जातीभेद, धर्म, स्वराज्य आणि रामराज्य प्रस्थापित करण्यातील अडथळा आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. गांधी धर्मांध राजकारणाला समाजात पसरणारे विष समजतं.