अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा ‘मिर्झिया’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हर्षचे जोरदार पदार्पण व्हावे याकरिता राकेश ओमप्रकाश मेहरा योजना करत असल्याचे कळते. दरम्यान, या चित्रपटाचे राजस्थान येथे चित्रीकरण सुरु असून तेथे कडक सुरक्षायंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
चित्रीकरणास्थळी फोटो काढण्यासही सक्त मनाई करण्यात आल्याचे कळते. नुकतचं निर्माता मेहरा यांनी काही विशेष दृश्यांकरिता कडक सुरक्षायंत्रणा ठेवली होती. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सैयमी खेरच्या लग्नाच्या चित्रीकरणाचे हे दृश्य होते. यावेळी तिने तब्बल ११ कोटींचे दागिने आणि वधू पोशाख परिधान केला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ४५ सुरक्षारक्षकांना रुजु करण्यात आले होते. इतकेच नाही, तर सदर दृश्याच्या चित्रीकरणावेळी नेमक्याचं क्रू मेम्बर्सना तेथे बोलवण्यात आले होते.
या अतिमहागड्या दृश्यामुळे ‘मिर्झिया’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकचं वाढली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 11:50 am