05 March 2021

News Flash

Video बंगाली गाण्यामुळे चिडले आसामी, शानवर फेकला कागदाचा बोळा

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लोकप्रिय गायक शान

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक शान याने आजवर त्याच्या सुमधूर आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे. परंतु श्रोत्यांना मनावर राज्य करणाऱ्या शानला आसाममध्ये एका कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं आहे. या शोमध्ये चाहत्यांनी त्याच्यावर कागदाचे बोळे फेकले आहेत.

काही दिवसापूर्वी गुवाहाटीमधील सरुसजाई स्टेडिअममध्ये एका कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोमध्ये शानचं गाणं श्रोत्यांच्या पसंतीत न पडल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत त्याच्यावर कागदाचा बोळा फेकला. इतकचं नाही तर काही श्रोत्यांनी येथील मालमत्तेचंदेखील नुकसान केल आहे.त्यात काही खुर्च्या तोडण्यात आल्या असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कार्यक्रम सुरु असताना शानने बंगाली गाणं म्हणण्यास सुरुवात केली. शानचं हे बंगाली गाणं पसंतीत न उतरल्यामुळे श्रोत्यांनी त्याच्यावर कागदाचा बोळा फेकला. मात्र या प्रकारानंतर शानने नाराजी व्यक्त करत कोणत्याही कलाकारासोबत असं वागणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

‘प्रत्येक कलाकार हा मेहनतीने पुढे आला असतो. त्यामुळे त्याच्या कलेचा मान राखा. माझी प्रकृती स्थिर नसतानादेखील मी केवळ तुमच्यासाठी येथे आलो आणि तुमच्यासाठीच हा परफॉर्मेस देत होतो. मात्र तुमचा असा रिस्पॉन्स असेल तर मलाही तुमच्या समोर माझी कला सादर करण्यात काही रस नाही’, असं शान म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला,’गाणं सुरु असताना कागदाचा बोळा फेकणाऱ्याला माझ्यासमोर आणा. एका कलाकाराचा आदर करावा एवढंदेखील माहीत नाही का ‘?

दरम्यान, या प्रकारानंतर आसाममधील काही नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शानची माफी मागितली आहे. शान हा बॉलिवूडमधील दिग्गज गायक असून त्याने आजवर अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्याप्रमाणेच काही कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक आणि परिक्षक म्हणून भूमिकाही बजावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 2:00 pm

Web Title: shaan attacked during guwahati concert for singing in bengali
Next Stories
1 #KedarnathTeaser : केदारनाथ प्रलयावर आधारित साराच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
2 Video : सेल्फीला वैतागून अभिनेत्याने फेकला चाहत्याचा फोन
3 या मराठी छायाचित्रकारामुळे दीपिकाचं बॉलिवूडमध्ये पाऊल
Just Now!
X