News Flash

मोदींना शुभेच्छा देताच शबाना आझमी ट्रोल

आझमींच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका करण्यास सुरूवात केली.

shabana azmi
शबाना आझमी

जनमताची नस पकडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा यशस्वी ठरले असून २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दमदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर सर्वच स्तरांतून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकार पण मागे नाहीत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीसुद्धा मोदींना आणि भाजपाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छांमुळेच त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

‘देशाच्या जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शुभेच्छा,’ असे त्यांनी ट्विट केले आहे. आझमींच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका करण्यास सुरूवात केली.

राजकारणावर आपली बेधडक मतं मांडायला शबाना आझमी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मी देश सोडेन असं विधान शबाना आझमी यांनी केल्याची बातमी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. याचाच संदर्भ घेत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 11:02 am

Web Title: shabana azmi congratulates pm narendra modi and gets trolled
Next Stories
1 आईप्रमाणेच तैमुरही करतोय डाएट, जाणून घ्या त्याच्या प्लॅनविषयी
2 मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी, अनुरागने मोदींना विचारला ‘हा’ प्रश्न
3 मोदींच्या विजयावर बॉलिवूड कलाकार म्हणाले..
Just Now!
X