News Flash

अभिनेत्री राजेश्वरी सचदेव करोना पॉझिटिव्ह

राजेश्वरी सध्या 'शादी मुबारक' या मालिकेत काम करत आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राजेश्वरी सचदेवला करोनाची लागण झाली आहे. राजेश्वरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सध्या राजेश्वरी शादी मुबारक या मालिकेत झळकत असून तिला करोनाची लागण झाल्यानंतर ती क्वारंटाइन झाली आहे.

काही दिवसांपूर्वी राजेश्वरीमध्ये करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे तिने करोना टेस्ट केली. या टेस्टमध्ये तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी राजेश्वरीला करोना असल्याची माहिती मिळाली आणि तिने ती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या तरी राजेश्वरी व्यतिरिक्त घरातील अन्य कोणत्याही सदस्यामध्ये करोनाची लक्षण जाणवत नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र गुरुवारी तिच्या पतीची वरुण बडोला आणि मुलाची करोना चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, राजेश्वरी सचदेवचे पती वरुण बडोलादेखील एक लोकप्रिय अभिनेता असून त्यांचे रिपोर्टस येईपर्यंत ते त्यांच्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेच्या सेटवर जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. राजेश्वरी सध्या ‘शादी मुबारक’ या मालिकेत कुसुम कोठारी ही भूमिका साकारत आहे. राजेश्वरीपूर्वी राजेश कुमार, हिमानी शिवपुरी, करम राजपाल, सचिन त्यागी, पार्थ समंथान यांनादेखील करोनाची लागण झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:40 pm

Web Title: shadi mubarak actress rajeshwari sachdev tests covid positive ssj 93
Next Stories
1 निवडणूकीचं तिकिट मागणाऱ्याला सोनू सूदचा भन्नाट रिप्लाय
2 “बॉलिवूडमधल्या ड्रग्ज माफियांची नावं उघड कर”; उर्मिला मातोंडकरचं कंगनाला आव्हान
3 ‘दु:ख दूर करण्यासाठी ड्रग्स…’, पूजा भट्टचे ट्विट व्हायरल
Just Now!
X