07 March 2021

News Flash

गौरीला लग्नाच्या वाढदिवशी कोणतं गिफ्ट दिलं?; शाहरुख म्हणाला…

कोट्यधीश किंग खाननं आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी कोणतं गिफ्ट दिलं?

शाहरुख खान आणि गौरी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. १९९१ साली या दोघांनी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून आजतागायत या दोघांनी एकमेकांची कायम साथ दिली आहे. अलिकडेच त्यांच्या लग्नाला तब्बल २९ वर्ष पुर्ण झाली. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवशी शाहरुखनं आपल्या पत्नीला काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

अलिकडेच लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन केलं होतं. या सेशनमध्ये नेटकरी शाहरुखला कुठलाही प्रश्न विचारतील अन् तो त्यांना उत्तरं देईल असं या सेशनचं स्वरुप होतं. त्यावेळी देखील एका चाहत्याने त्याला हाच प्रश्न विचारला. “शाहरुख तुझ्या लग्नाला २९ वर्ष पुर्ण झाली. वाढदिवशी तू आपल्या पत्नीला कोणतं गिफ्ट दिलंस?” चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, “गौरी हिच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. तिला मी काय देणार?” शाहरुखचं हे गंमतीशीर उत्तर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 8:33 pm

Web Title: shah rukh gauri khan marriage anniversary mppg 94
Next Stories
1 ‘मन्नत विकणार आहेस का?’; नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुखनं दिल प्रेरणादायी उत्तर
2 कपिल शर्मा शोनंतर मुकेश खन्ना यांचा ‘लक्ष्मी बॉम्ब’वर निशाणा
3 ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेतून मोनिका बागुल करणार छोट्या पडद्यावर पदार्पण
Just Now!
X