News Flash

आर्यनच्या पदवीग्रहण कार्यक्रमाला शाहरुखची उपस्थिती

आर्यन याने नुकतेच लंडन येथून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

छायाचित्रात शाहरुख आपल्या मुलाच्या अर्थाच आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून उभा असलेला पाहायला मिळतो

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन याने नुकतेच लंडन येथून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आर्यनच्या पदवीग्रहण कार्यक्रमाला शाहरुख आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून स्वत: लंडनमध्ये आर्यनसोबत उपस्थित होता. सोशल मीडियावर शाहरुखच्या मुलांची नेहमीच चर्चा असते. शाहरुख देखील आपल्या मुलांसोबतचे खास क्षण समाज माध्यमांमध्ये शेअर करत असतो. आर्यनच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणांची छायाचित्रे देखील शाहरुखने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केली आहेत. छायाचित्रात शाहरुख आपल्या मुलाच्या अर्थाच आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून उभा असलेला पाहायला मिळतो, तर बाजूला शाहरुखची मुलगी सुहाना देखील उपस्थित आहे. सुहाना देखील आज १६ वर्षांची झाली आहे. याचाही आनंद शाहरुखने व्यक्त केला आहे. शाहरुखची पत्नी गौरी हिने आर्यनचे त्याच्या वर्गमित्रांसोबतचे पदवीग्रहण केल्यानंतरचे छायाचित्र शेअर केले आहे.

Graduation Day ….

A photo posted by Gauri Khan (@gaurikhan) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2016 10:14 am

Web Title: shah rukh khan attends son aryans graduation day with daughter suhana see pics
Next Stories
1 सूर म्हणतो साथ दे..
2 निशिकांतची ‘बॉलीवूड’ फास्ट!
3 उदाहरणार्थ नेमाडे