News Flash

..म्हणून अनन्याने सुहानाकडे उधारीवर मागितला टॉप

अनन्या आणि सुहाना बेस्टफ्रेंड आहेत

कलाविश्वातील कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजे स्टारकिड्सची कायमच चर्चा रंगत असते. या स्टारकिडमध्ये सध्याच्या घडीला सुहाना खान आणि अनन्या पांडे या दोघींची सर्वाधिक चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं. या दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड असून बऱ्याच वेळा त्यांना काही कार्यक्रमांमध्ये वगैरे एकत्र पाहिलं जातं. सध्या या दोघींमधील एका संवादाची चर्चा रंगली असून अनन्याने सुहानाकडे तिचा टॉप उधार मागितल्याचं दिसून येत आहे.

अनन्या आणि सुहाना एकमेकींच्या बेस्टफ्रेंड्स असून त्यांची मैत्री बऱ्याच वेळा पाहायला मिळते. अलिकडेच सुहानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. हा टॉप अनन्याला आवडला असून त्याने या फोटोवर मजेशीर कमेंट केली.

मला हा टॉप फार आवडला आहे. मात्र तू मला तो उधार देणार नाहीस, अशी कमेंट अनन्याने या फोटोवर दिली. अनन्याची कमेंट वाचल्यावर सुहानानेदेखील त्याच अंदाजात तिला उत्तर दिलं माझी शॉर्ट्स परत करत, असं सुहाना म्हणते. त्यावर अनन्याने कधीच नाही. मी आतादेखील तुझ्या शॉर्ट्स वापरत आहे आणि कायम वापरणार, असं अनन्या म्हणाली. या दोघींच्या या कमेंट्स पाहून अनेकांना त्यांच्या सखोल मैत्रीचा अंदाज आला.

दरम्यान, सध्या लॉकडाउन असल्यामुळे सेलिब्रिटी घरातच आहेत. या काळात सुहाना घरात राहून तिचा क्वालिटी टाइम घालवत आहे. या काळात गौरी खानने सुहानाचे काही फोटो काढले असून ते सुहानाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 11:15 am

Web Title: shah rukh khan daughter suhana photo shoot goes viral ananya panday asks if she can borrow the top ssj 93
Next Stories
1 “राजकीय नेत्याशी माझं लग्न झालेलं नाही”; लग्नाच्या अफवांवर सोनालीचं स्पष्टीकरण
2 ‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना
3 हृतिकसोबत असलेल्या या मुलाला ओळखलंत का?; आता आहे सर्वांत लोकप्रिय अभिनेता
Just Now!
X