News Flash

शाहरुखने आमिर खानला काजोल सोबत काम न करण्याचा दिला होता सल्ला

शाहरुखने बाजीगर चित्रपटाच्या वेळी घडलेला किस्सा सांगितला होता.

शाहरुखने आमिर खानला काजोल सोबत काम न करण्याचा दिला होता सल्ला

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीने एकेकाळी रुपेरी पडदा गाजवला होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत अनेकांची मने जिंकली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. पण शाहरुखने आमिरला काजोलसोबत काम न करण्याचा सल्ला दिला होता.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, दिलवाले चित्रपटाच्या वेळी शाहरुखची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्याने बाजीगर चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला. “जेव्हा मी काजोलसोबत बाजीगर चित्रपटात काम करत होतो तेव्हा आमिर खानने मला काजोल विषयी विचारले होते. त्याला काजोलसोबत काम करायचे होते. मी त्याला त्यावेळी, ‘ती चांगली अभिनेत्री नाही. तिचे कामावर लक्ष नाही. तु तिच्यासोबत काम करु शकणार नाही’ असे सांगितले होते.” असे शाहरुख म्हणाला.

त्यानंतर शाहरुखने कजोलमधील टॅलेंट पाहिले. त्याने पुन्हा आमिरला पुन्हा फोन केला आणि काजोलच्या अभिनयाची प्रशंसा केली. ‘मी पुन्हा आमिरला फोन केला आणि त्याला आधी सांगितलेल्या गोष्टींवर पुन्हा बोललो. मला माहित नव्हते ती स्क्रिनवर जादू करते’ असे शाहरुख म्हणाला.

तसेच शाहरुखने एका मुलाखमध्ये त्याची मुलगी सुहाना खानने काजोलकडून अभिनयाचे धडे घ्यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. काजोल एक अतिशय इमानदार आणि चांगली अभिनेत्री आहे. माझी मुलगी देखील अभिनेत्री होऊ इच्छिते. तिने काजोलकडून अभिनयाचे धडे घ्यावेत अशी माझी इच्छा आहे असे शाहरुख म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 1:31 pm

Web Title: shah rukh khan had advised aamir khan to not work with kajol avb 95
Next Stories
1 “नव्या कलाकारांसोबत होतोय अन्याय”; बॉलिवूडमधील घराणेशाहीवर संतापला अदनान सामी
2 प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणणारा कलाकार जॉबलेस होऊ शकत नाही – दलीप ताहिल
3 लॉकडाउनमुळे अभिनेत्री अडकली लंडनमध्ये; एक झलक पाहण्यासाठी फॅन्स घराखाली करतात गर्दी
Just Now!
X