News Flash

…म्हणून ‘मन्नत’मध्ये शाहरुखने बांधले नवे किचन

२०१७ या वर्षात प्रत्येकजण नवीन काहीतरी शिकण्याचा संकल्प करतात

शाहरुख खान

बॉलिवूडला किंग म्हणजे शाहरुख खान हरहुन्नरी कलाकार आहे याबद्दल कोणाचंच दुमत नसेल. त्याचा अभिनय, आवाज, व्यक्तिमत्व हे सर्वांनाच प्रभावित करणारे असते. अथक परिश्रमातून त्याने या सिनेसृष्टीत आपले नाव कमावले आणि आपला चाहता वर्ग तयार केला. एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणून त्याने नाव कमावले. पण, तुम्हाला हे माहितीये का तो एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याला जेवण बनवायलाही तितकेच आवडते. स्वतःचे जेवणातले ज्ञान अधिक चांगले करण्यासाठी त्याने त्याच्या ‘मन्नत’ या घरी एक नवे किचन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच त्याने ही माहिती सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना तो म्हणाला की,‘ माझ्या कुटुंबातील सदस्य हे रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जातात. पण, मला असे वाटते की, घरचे जेवणच आरोग्यासाठी चांगले असते. म्हणून मी आता इटालियन खाद्य-पदार्थ बनवायला शिकत आहे. मी आता पास्ता, रिसोटो आणि तिरामिसू हे पदार्थ बनवू शकतो. पण, यासर्वांपलीकडे मला सर्वांना त्यांचे पोट भरेपर्यंत वाढायला प्रचंड आवडते.’

तसेच त्याने संगीत शिकायचेही मनावर घेतले आहे असे कळते. आता शाहरुख संगीत शिकणार म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी योग्य असाव्यात याकडे तो लक्ष देणारचं ना.. संगीत शिकण्यासाठी त्याने खास दोन महागडे गिटार विकत घेतले आहेत. एक त्याच्यासाठी आणि दुसरे त्याचा मुलगा आर्यनसाठी. तो म्हणतो, ‘जर आम्ही तिघेही गिटार शिकलो तर घरचेच ‘बॉयबँण्ड’ तयार होईल, नाही का?’

२०१७ या वर्षात प्रत्येकजण नवीन काहीतरी शिकण्याचा संकल्प करतात. शाहरूखने त्याचे इटालियन जेवण शिकण्याचे आणि संगीत शिकण्याचा संकल्प केलेला दिसतोय. ‘रईस’ या आगामी सिनेमामुळे शाहरूख खान सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यामुळे हा सिनेमा वादात अडकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 8:46 pm

Web Title: shah rukh khan new kitchen mannat bungalow
Next Stories
1 जाणून घ्या प्रियांका चोप्राचे नवीन वर्षातले संकल्प
2 अर्जुन कपूरच्या अनाधिकृत जीमवर अखेर हातोडा
3 पुन्हा एकदा खेळाडूच्या भूमिकेत दिसणार सुशांत सिंग राजपूत
Just Now!
X