01 December 2020

News Flash

शाहरुखने सांगितलं, ‘या’ कारणामुळे मी आणि अक्षय एकत्र काम नाही करु शकतं

अक्षय कुमारसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का?

दोन मोठे कलाकार एकत्र येतात, तेव्हा त्या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुक्ता असते. शाहरुख, सलमान आणि आमिर हे तिन्ही खान चित्रपटात एकत्र कधी दिसणार? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांकडून विचारला जातो. चाहत्यांची बॉलिवूडमधली ही तिन्ही खान मंडळी आणि अक्षय कुमारला सुद्धा एकत्र चित्रपटात पाहण्याची इच्छा आहे.

अक्षय कुमारसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न जेव्हा शाहरुखला विचारण्यात आला. तेव्हा त्याने “मी यावर काय बोलू? अक्षय सकाळी जितक्या लवकर उठतो, तितक्या लवकर मी उठत नाही” असे सांगितले.

“अक्षय जेव्हा सकाळी उठतो, तेव्हा मी झोपायला जातो. त्याचा दिवस सकाळी लवकर सुरु होतो. मी काम सुरु करतो, तेव्हा तो पॅकअप करुन घरी निघालेला असतो. मी निशाचर आहे. माझ्यासारखं फार कमी जणांना रात्रीच्यावेळी शूटिंग करायला आवडतं असेल” असे शाहरुख डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

कोणी आम्हाला चित्रपटात घेतले तर, आम्ही सेटवर एकत्र भेटणारच नाही असे शाहरुख म्हणाला. “आम्ही दोघे सेटवर भेटणारच नाही. तो जात असेल, तेव्हा मी येणार. अक्षय सोबत आणि त्याच्यासारखं काम करायला मला आवडेल पण आमची वेळ जुळणार नाही” असे शाहरुखने सांगितले. अक्षण सकाळच्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठी ओळखला जातो. तेच शाहरुखचे रात्री काम करण्याला प्राधान्य असते. अक्षयचा ‘लक्ष्मी’ चित्रपट कालच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 6:38 pm

Web Title: shah rukh khan said he and akshay kumar can never work together for this reason dmp 82
Next Stories
1 नितीश कुमारांचा पराभव लांबणीवर पडतोय इतकंच, सत्ता आमचीच येणार-मनोज झा
2 रानू मंडल पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, गाणार या चित्रपटातील गाणे
3 घटस्फोटित पत्नीचा दावा ठरला खरा; कोट्यवधींच्या चित्रपटातून सुपरस्टारला केलं बाहेर
Just Now!
X