बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची बहिण नूर जहां यांचे मंगळवारी पाकिस्तानातील पेशावर येथे निधन झाले. त्या शाहरुखच्या चुलत बहिण होत्या. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नूर गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.

कोण होत्या नूर जहां?

नूर जहां शाहरुखच्या चुलत काकांची मुलगी होती. त्या पेशावर येथील मोहल्ला शाह वली कतल परिसरात राहत होत्या. त्या पाकिस्तानातील राजकारणात देखील सक्रिय होत्या. तसेच नूर जहां शाहरुख खानला भेटण्यासाठी दोनदा भारतात देखील आल्या होत्या. शाहरुख आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पेशावर येत जात असे.