बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मुलाने आर्यनने नुकतंच कलाविश्वामध्ये पदार्पण केलं आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी त्याने त्याचा आवाज दिला आहे. त्यामुळे सध्या आर्यन प्रकाशझोतामध्ये आहे. या कारणाव्यतिरिक्त तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी झळकत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही मुलगी नक्की कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

प्रसारमाध्यमांपासून शक्यतो लांब राहणारा आर्यन एका मुलीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर आर्यनचे एका मुलीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो एका पार्टीमधील असून आर्यन या मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र ही मुलगी नक्की कोण आहे हे स्पष्ट झालं नसून सध्या तिच्याविषयी अनेक चर्चा होत आहेत. काहींच्या मते आर्यन या मुलीला डेट करत आहे. तर काहींच्या मते ती लंडनमधील  एक बेस्ट ब्लॉगर असून केवळ आर्यनची मैत्रीण आहे. परंतु या साऱ्यावर आर्यनने अद्यापतरी त्याचं मत व्यक्त केलेलं नाही.

 वाचा :  Video : किसिंग सीन करणारी ‘ही’ ठरली पहिली बॉलिवूड अभिनेत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर्यनचे हे फोटो एका पार्टीमधील असून यात हे दोघं डान्स करताना, गप्पा मारताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्यांच्या नात्याविषयी प्रश्न पडले आहेत. त्यासाठीच आर्यनच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला ही मुलगी कोण आहे ?, ती तुझी गर्लफ्रेंड आहे का? असे प्रश्न विचारले आहेत.  आर्यनचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. मात्र तरीही आर्यन लाइम लाइटपासून दूर राहणं पसंत करतो.