News Flash

..यामुळे करिना-शाहिदमधील दुरावा संपला

मला तिच्यासाठी खूपच आनंद होत आहे.

शाहिद कपूर, करिना कपूर

‘जब वी मेट’ या चित्रपटानंतर अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या नात्याविषयी नवनवीन चर्चांना उधाण आले होते. पण, या दोघांनीही त्यांच्या नात्यांविषयी होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत आपआपले मार्ग निवडले. नात्यामध्ये आलेल्या या आंबटगोड अनुभवांना विसरत या कलाकारांनी जीवनात पुढे मार्गस्थ होण्याला प्राधान्य दिले. इतकेच नव्हे तर, त्यांनी बऱ्याच काळानंतर ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र कामही केले.

पाहा: प्रेगनेन्सीमध्ये करिनाचे फोटोशूट

एका चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरासमोर आलेल्या करिना आणि शाहिने त्यांच्या नात्याला एक नवे नाव दिल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे, शाहिद कपूर बाबा झाल्यानंतर करिनाने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचप्रमाणे शाहिदही करिनाची तिच्या गरोदरपणाविषयीची चौकशी करण्यापासून मागे सरसावला नाही.

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये करिनासोबत झालेल्या भेटीबद्दल शाहिदने एका वृत्तपत्राला माहिती दिली. ‘गरोदरपणातील करिनाला पाहून मी खूपच आनंदित झालो. कारण मी नुकताच त्या वळणावरुन गेलो आहे (बाप झालो आहे). मला तिच्यासाठी खूपच आनंद होत आहे. मी तिची विचारपूसही केली. तिनेही मिशाची विचारपूस केली……हे खूप छान होतं’, असे शाहिद म्हणाला. त्यामुळे या दोन्ही कलाकारांची मुलं त्यांच्या मैत्रीच्या नात्याला नव्याने जोडणारा एक दुवा ठरत आहेत असेच म्हणावे लागेल.

वाचा: शाहिद आणि करिना एकमेकांना मिठी मारून भेट घेतात तेव्हा..

दरम्यान, सध्या अभिनेता शाहिद कपूर त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये शाहिद मेवाडचा राजा रतन सिंग यांच्या भूमिकेत झळणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगसुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून संजय लीला भन्साळी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:54 pm

Web Title: shahid kapoor kareena kapoor khans baby talk is way too awesome
Next Stories
1 लंडनमधील उपहारगृहात शिल्पा शेट्टीच्या नावाने ‘एसएसके स्पेशल’ डिश!
2 ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या दिग्दर्शकाची जीभ छाटणा-यास १ कोटीचे बक्षीस
3 पाहा: ..अशा प्रकारे शाहरुखने केला अब्रामचा बचाव
Just Now!
X