अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. शाहिदसोबतच यामध्ये कियारा अडवाणीची मुख्य भूमिका आहे. ट्रेलरमधील शाहिद आणि कियारा यांच्यातील केमिस्ट्रीने विशेष लक्ष वेधून घेतले. याविषयीच ट्रेलर लाँच कार्यक्रमात प्रश्न विचारल्यावर शाहिद पत्रकारावर चिडला.

‘कबीर सिंग’च्या ट्रेलरमध्ये शाहिद आणि कियाराचा किसिंग सीन आहे. ‘तर संपूर्ण चित्रपटात तुमचे किती किसिंग सीन आहेत,’ असा प्रश्न पत्रकाराने कियाराला विचारला. यावर तिने हसत उत्तर दिले की, ‘मी मोजले नाहीत.’ यानंतर त्या पत्रकाराने पुन्हा एकदा कियाराला तोच प्रश्न विचारला तेव्हा शाहिदचा पारा चढला. यावेळी कियाराऐवजी शाहिदनेच त्याला उत्तर दिले की, ‘तुला गर्लफ्रेंड नाही म्हणून असा प्रश्न विचारतोय की याशिवाय तुझ्याकडे दुसरे प्रश्न नाहीत?’ चित्रपटात अभिनयसुद्धा भरभरून आहे असा उपरोधिक टोलाही शाहिदने लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला. त्यामुळे आता ‘कबीर सिंग’ हिंदीमध्ये कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संदिप वांगा दिग्दर्शित हा चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.