बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा त्याच्या आगामी ‘उडता पंजाब’ चित्रपटातील फर्स्टलूक प्रदर्शित करण्यात आला असून, शाहिद ‘रॉकस्टार’च्या लूकमध्ये दिसून येत आहे. चित्रपटात शाहिद टॉमी सिंग नावाची भूमिका साकारत आहे. पंजाबी रॉकस्टारच्या आवेशात शाहिदचा हा लूक नक्कीच लक्ष वेधून घेतो. इश्किया फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केलेला उडता पंजाब हा चित्रपट १७ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटात शाहिद सोबत त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी करिना कपूर देखील दिसणार आहे. याशिवाय, अभिनेत्री आलिया भटचीही चित्रपटात भूमिका आहे.