News Flash

एक वर्षाची झाली मिशा; शाहिदने शेअर केला क्यूट सेल्फी

मिशाचं गोंडस हसू अनेकांची मनं जिंकून घेतं

शाहिद कपूर कुटुंबासमवेत

शाहिद कपूर आणि मिरा राजपूत यांची कन्या मिशा ही उद्या वर्षाची होणार आहे. तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तिघेही काही दिवसांपूर्वी लंडनला रवाना झाले होते. मिशाच्या वाढदिवसाअगोदर बाबा शाहिदने त्यांच्या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्टार किडचा चाहता वर्गही फार मोठा आहे. त्यामुळेच शाहिद अनेकदा मिशासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करताना ‘सर्वोत्तम क्षण’ असा मेसेज त्याने लिहिला. मिरा आणि शाहिदच्यामध्ये असलेल्या मिशाचं गोंडस हसू अनेकांची मनं जिंकून घेतं. पहिल्यापासूनच मिशा ही कॅमेऱ्याला सरसावलेली दिसते. गेल्या वर्षी २६ ऑगस्टला शाहिद आणि मिशाच्या घरी या नवीन सदस्याचे आगमन झाले. शाहिदने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी शेअर केली होती. ‘तिचं आगमन झालंय आणि आनंद व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभारी आहे.’

काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात मिशाच्या वाढदिवसाला काय करणार, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला असता तो म्हणाला की, ‘आम्ही कदाचित यावेळी भारतात नसू. एकमेकांसोबत निवांतक्षण घालवण्यासाठी आम्ही परदेशात जाण्याच्या विचारात आहोत.’ आतापर्यंतचे व्हेकेशनचे फोटो शेअर केल्यानंतर शाहिद उद्या मिशाचा वाढदिवस कसा साजरा करणार याचीच उत्सुकता तिच्या आणि शाहिदच्या चाहत्यांना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 12:44 pm

Web Title: shahid kapoors family photo ahead of mishas first birthday is a perfect start to the celebrations
Next Stories
1 तिहेरी तलाक, राइट टू प्रायव्हसीवर ट्विंकलचा विनोद वाचलात का?
2 Sairat remake : ‘सैराट’साठी करण जोहरला मदत करण्यास नागराज मंजुळेचा नकार!
3 Ganesh Chaturthi 2017: सलमानच्या बाप्पाची पहिल्यांदाच होणार बहिणीच्या घरी प्राणप्रतिष्ठा; अशी करण्यात आलीय आगमनाची तयारी
Just Now!
X